Mumbai, जानेवारी 28 -- Tata Nexon iCNG Red Dark Edition Launched: टाटा नेक्सॉन आयसीएनजी रेड डार्क एडिशन लॉन्च करण्यात आले असून त्याची एक्स-शोरूम किंमत १२.७० लाख रुपये आहे. क्रिएटिव्ह, क्रिएटिव्ह+ पीएस आणि फियरलेस+ पीएस या तीन ट्रिम लेव्हलमध्ये उपलब्ध आहे. क्रिएटिव्ह+ पीएस आणि फियरलेस+ पीएस या दोन व्हेरियंटची किंमत १३.७० लाख आणि १४.७० लाख रुपये आहे. सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत. म्हणजेच टाटा सब कॉम्पॅक्ट सीएनजी एसयूव्हीच्या रेड डार्क एडिशन क्रिएटिव्ह आणि क्रिएटिव्ह+ पीएस व्हेरिएंट तुलनेत ४० हजार रुपयांनी महाग आहे, तर, फियरलेस + पीएस तुलनेत २० हजार रुपयांनी महाग आहे.

अतिरिक्त पैशांसाठी टाटा नेक्सॉन आयसीएनजी रेड डार्क एडिशनमध्ये ऑल ब्लॅक एक्सटीरियर पेंट शेड देण्यात आली आहे. यात अ‍ॅटलस ब्लॅक बॉडी कलर, फ्रंट ग्रिल आणि अलॉय व्हील्सचा समावेश आहे...