Pune, फेब्रुवारी 10 -- शिवसेनेने आमदार व माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा घरातून रुसून गेलेला मुलगा अखेर पुणे विमानतळावर उतरला आहे. तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याच्या वृत्ताने खळबळ माजली होती. त्याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे. बँकॉकला जाणारे ऋषिराज सावंत हे आता पुण्यात आपल्या घरी परतले आहेत. आमच्यात कोणताही वाद नाही,पण ऋषिराज घरी न सांगता बँकाकला का गेला याची माहिती घेणार असल्याची प्रतिक्रिया तानाजी सावंत यांनी दिली आहे.

दरम्यान पुणे पोलिसांच्या कार्यतत्परचेची राज्यभर चर्चा रंगली आहे. तानाजी सावंत यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी वाऱ्याच्या वेगाने सूत्रे फिरवत अवघ्या चार तासांत बँकॉकला जाणारे विमान हवेतूनच माघारी फिरवत सावंतांचा मुलाला पुण्यात लँड करण्यास भाग पाडले. संबंधित व्यक्ती घरातून निघून गेल्यानंतरच्या २४ तासांनंत...