Buldhana, जानेवारी 29 -- Buldhana Takkal Virus : बुलढाणा जिल्ह्यात टक्कल व्हायरसने तब्बल ११ गावांचं टेंशन वाढलं होतं. शेगाव परिसरातील गावांमध्ये नागरिकांच्या डोक्यावरची केस अचानक गळू लागली होती. डोक्याला खाज येऊन केसगळती होऊन टक्कल पडत होते. तब्बल २०० पेक्षा अधिक नागरिकांना टक्कल पडलं होतं. यामुळे गावात केंद्रीय पथक देखील झालं होत. आता गेस गेलेल्यांना पुन्हा केसं येऊ लागल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील काही गावात लहान मुलांपासून मोठ्या नागरिकांना अचानक केस गळती होऊन त्यांचे टक्कल पडत होते. या केस गळतीचे कारण शोधण्यासाठी दिल्ली, पाटणा, चेन्नई, मुंबई येथून डॉक्टरांचे पथक बुलढण्यात दाखल झाले होते. विविध प्रकारच्या तपासण्या करून त्यांनी टक्कल का पडत आहे याचे करण शोधले होते. या साठी जास्त घनता असलेले पाणी कारणीभूत असल्याच...