भारत, जानेवारी 28 -- मुंबईत एका ग्राहकाने स्विगीवरून पनीर बर्गर ऑर्डर केली असता त्याच्या घरी आलेल्या पार्सलमध्ये पनीर ऐवजी चक्क चिकन बर्गर मिळाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे वैतागलेल्या या ग्राहकाने थेट स्विगीकडे तक्रार केली आहे. या ग्राहकाने ज्या रेस्टॉरंटमधून हे खाद्यपदार्थ मागवले होते त्या सांताक्रूज (पूर्व) भागातील रेस्टॉरंटला त्याने भेट दिली आणि तेथील अस्वच्छतेबाबत एक पोस्ट आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.

या रेस्टॉरंटला भेट दिल्यानंतर या ग्राहकाला तेथे भयंकर अस्वच्छता दिसली. तेथील अस्वच्छ वातावरणाबद्दल ग्राहकाने पोस्टमध्ये सविस्तर लिहिलं आहे. या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये ग्राहक लिहितो, 'मित्रांनो, कलिना मुंबईतील सांताक्रूझ- पूर्व कलिना येथील @freshmenu टॅग करा'. येथील ...