Mumbai, फेब्रुवारी 5 -- Swiggy News in Marathi : फूड डिलिव्हरी व क्विक कॉमर्स उद्योगातील प्रमुख कंपनी स्विगीनं आर्थिक वर्ष २०२४-२५ (आर्थिक वर्ष २०२५) च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. झोमॅटो व झेप्टोला टक्कर देऊ पाहणाऱ्या स्विगीला या निकालांनी दणका दिला आहे. कंपनीचा निव्वळ तोटा वाढून ८०० कोटींवर पोहोचला आहे.

गेल्या वर्षी याच कालावधीत स्विगीचा तिमाही तोटा ५२४ कोटी रुपये होता. प्रतिस्पर्धी झोमॅटो आणि झेप्टोशी स्पर्धा करण्यासाठी कंपनीनं क्विक कॉमर्स व्यवसायात गुंतवणूक केली आहे. त्याचाही परिणाम नफ्यावर झाला आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत नव्यानं सूचीबद्ध झालेल्या स्विगीचं कामकाजातून मिळणारं उत्पन्न ३१ टक्क्यांनी वाढून ३,९९३ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ते ३,०४९ कोटी रुपये होतं. कंपनीचा ए...