Mumbai, जानेवारी 31 -- Swara Bhasker X Account : अभिनेत्री स्वरा भास्कर सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते आणि चित्रपटाशी संबंधित मुद्दा असो किंवा देशाशी संबंधित कोणताही मुद्दा असो, ती आपले मत व्यक्त करण्यास मागे हटत नाही. पण आता स्वराचं ट्विटर म्हणजेच एक्स अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं असून, यामुळे अभिनेत्री प्रचंड संतापली आहे. यामागे तिचीच एक पोस्ट कारणीभूत ठरली आहे.

रागाच्या भरात स्वराने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली की, तिचे ट्विटर अकाऊंट कायमचे बंद करण्यात आले आहे, तेही तिच्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा पोस्टसाठी. त्यानंतर स्वराने आपल्या कोणत्या पोस्टमुळे अशी कारवाई केली आहे, हे देखील सांगितले. अभिनेत्रीने सांगितले आहे की, तिच्या दोन वेगवेगळ्या पोस्टवर कॉपीराइट उल्लंघनाबद्दल चेतावणी देण्यात आली होती, त्यानंतर तिचे एक्स अकाऊंट कायमचे बंद क...