Pune, मार्च 22 -- पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सूनआणि हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सावरकर यांच्या पत्नी स्वामिनी सावरकर पुण्यात वयाच्या ८३ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्य़क्ष रणजित सावरकर हे त्यांचे पुत्र होत.

Earthquake: भूकंपाच्या धक्क्यांनी उत्तर भारत हादरला; जिवाच्या आकांताने नागरिक पळत सुटले रस्त्यावर, पाहा फोटो

स्वामिनी सावरकर या पूर्वाश्रमीच्या मंदाकिनी गोखले. नागपूर येथील पांडुरंग गोखले परिवारात त्यांचा १८ डिसेंबर १९३९ या दिवशी जन्म झाला. त्यांचा विवाह नारायणराव सावरकर यांचे पुत्र विक्रम यांच्यासमवेत झाला. पृथ्वीराज आणि रणजित ही त्यांची दोन मुले असून, पृथ्वीराज सावरकर यांचे नुकतेच निधन झाले.

Maharashtra weather : गुडी पाडव्याच्या शोभा यात्रांवर पावसाचे स...