भारत, फेब्रुवारी 4 -- border gavaskar trophy 2023 test series : भारताने टी-20 मालिकेत न्यूझीलंडचा २-१ असा पराभव केला. आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. दोन्ही संघांमधील मालिकेतील पहिला सामना ९ फेब्रुवारीपासून नागपुरात खेळवला जाणार आहे. या मालिकेसाठी जवळपास दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. भारतीय संघाचे खेळाडू नागपुरात पोहोचले आहेत.

या मालिकेपूर्वीच स्टार फलंदाज श्रेयस अय्यरच्या नागपूर कसोटीतून बाहेर पडला आहे. आता त्याच्या जागी सूर्यकुमार यादवची संघात निवड करण्यात आली आहे. सोबतच सुर्याला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.

खरं तर, श्रेयस अय्यर त्याच्या पाठीच्या दुखण्यातून अद्याप पूर्णपणे फिट झालेला नाही आणि त्याला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी अजून २ आठवडे लागतील. अशा परिस्थितीत ...