Mumbai, मे 2 -- ज्योतिष शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्याची स्थिती भक्कम असते. त्या व्यक्तीचे नशीब उजळून निघते. अश्या व्यक्ती ज्या कामात हात घालतील त्यात त्यांना यश मिळते. त्यामुळेच सूर्याला ग्रहांचा राजा असे संबोधले जाते. मे महिन्यात अनेक राशींना सूर्य संक्रमणाचा मोठा फायदा होणार आहे. सध्या सूर्य राशीचक्रातील पहिली राशी मेष या राशीत विराजमान आहे. येत्या काही दिवसांत सूर्य मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे लवकरच वृषभ राशीच्या लोकांचे नशीब उघडणार आहे. येत्या १४ मे च्या दिवशी सायंकाळी ५ वाजून ५४ मिनिटांनी वृषभ राशीमध्ये सूर्याचे संक्रमण होणार आहे. सूर्याच्या संक्रमणामुळे मेष, सिंह, कर्कसह पाच राशींचे नशीब चमकणार आहे.

सूर्याचे संक्रमण मेष राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. विविध कार्यात भरघोस यश मिळण...