Mumbai, फेब्रुवारी 13 -- Surbhi Hande New Series : 'गाववाटा' ट्रॅव्हेल सीरिजचा पहिला भाग नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री सुरभी हांडे या सीरिजमधून प्रेक्षकांना महाराष्ट्रातील दुर्गम गावांच दर्शन घडवणार आहे. सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी अतिशय दुर्गम भागात एक शांत आंबावडे गाव वसलेलं आहे. त्या गावाचा इतिहास, तेथील संस्कृती जपणारी माणसं यांचं अतिशय देखणं रूप या पहिल्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळालं आहे. सुरभीने एका अशा गावाला भेट दिली आहे, जिथे निसर्गाची शांतता आणि पारंपरिक जीवनशैली अजूनही जिवंत आहे.

अभिनेत्री सुरभी हांडे 'गाववाटा' ट्रॅव्हेल सीरिजच्या अनुभवाविषयी बोलताना म्हणाली की, 'गाववाटा या सीरिजच शूटिंग अतिशय दुर्गम गावांमध्ये झालं आहे. अशी गाव होती जिथे पाणी आणि वीज अजूनही पोहोचली नाही आहे. या सीरिजचा पहिला भा...