Mumbai, फेब्रुवारी 2 -- Suraj Chavan Marathi Movie : 'बिग बॉस मराठी'च्या यंदाच्या पर्वाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. या पर्वात सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण याने विजेतेपदावर आपलं नाव कोरले. 'बिग बॉस मराठी'च्या ट्रॉफीवर सूरजचं नाव कोरलं गेल्यावर निर्माते-दिग्दर्शक केदार शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली, ज्यामुळे साऱ्यांचे लक्ष वेधले गेले होते. 'बिग बॉस मराठी' संपल्यावर सूरज चव्हाण लवकरच केदार शिंदे दिग्दर्शित एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. अखेर त्यांची घोषणा खरी ठरली असून, सूरज चव्हाण अभिनीत 'झापूक झुपूक' चित्रपटाचं पोस्टर आणि त्याचा फर्स्ट लूक नुकताच समोर आला आहे.

सूरज चव्हाणचा 'झापूक झुपूक' हा चित्रपट २५ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सूरज चव्हाण मुख्य भूमिक...