Mumbai, फेब्रुवारी 4 -- Suraj Chavan Granted Bail: मुंबई महानगरपालिकेतील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या निकटवर्तीय सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) आज (०४ फेब्रुवारी २०२४) जामीन मंजूर केला. न्यायाधीश मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने हा निर्णय दिला. सूरज चव्हाण यांना कथित खिचडी घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली असून ते १७ जानेवारी २०२४ पासून तुरुंगात आहेत. वर्षभरानंतर चव्हाण यांची कारागृहातून सुटका होणार आहे.

सूरज चव्हाण यांना १७ जानेवारी २०२४ रोजी कोरोना काळातील खिचडी घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली. तेव्हापासून ते तुरुंगात होते. सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती मिलि...