Mumbai, जानेवारी 29 -- Govinda Wife Sunita Ahuja : गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा नेहमीच तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते. कुठल्याही विषयावर बोलायला ती कधीच मागेपुढे पाहत नाही. आता सुनीता म्हणाली की, तिला गोविंदाबद्दल अधिक असुरक्षितता वाटत आहे, कारण आता अभिनेत्याकडे काम नाही, त्यामुळे आता त्याच्याकडे अफेअर करण्यासाठी बराच वेळ आहे. सुनीता म्हणाली की, तिला आता स्वतःसाठी नवीन करिअर करायचे आहे.

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सुनीता म्हणाली की, 'मला १९८६ मध्ये 'तन बदन' या चित्रपटात भूमिका मिळाली होती, त्यातही गोविंदा होता. तो माझ्या मेव्हण्याचा चित्रपट होता, पण मला काम करायचं नव्हतं. त्यामुळे तो खुशबूकडे गेला. त्यावेळी मी आईकडे बघायचे, कुटुंबाची काळजी घ्यायची, घर सांभाळायचे, म्हणूनच माझं लक्ष फक्त लग्न करून गृहिणी होण्याकडे होतं. मी माझ...