Mumbai, मे 3 -- Mumbai Local Mega Block: मुंबई लोकमधून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी येत्या रविवारी (०५ मे २०२४) मध्य रेल्वेकडून उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मध्य रेल्वेने दिलगिरी व्यक्त केली. रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित निर्धारित थांब्यावर थांबून डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचेल.

ठाण्यापुढील जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्या...