Mumbai, जानेवारी 29 -- Sugar Stocks News in Marathi : केंद्र सरकारनं इथेनॉलच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केल्याचे पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत. या निर्णयाचा फायदा साखर कंपन्यांना होण्याची शक्यता असल्यानं या कंपन्याचे शेअर आज चांगले उसळले.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, सी-ग्रेड गुळापासून (एक्स-मिल) मिळणाऱ्या इथेनॉलची किंमत १.६९ रुपयांनी वाढवून ५७.९७ रुपये प्रतिलिटर होणार आहे. या बातमीमुळे गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात सूचीबद्ध साखरेच्या शेअर्सवर नाराजी व्यक्त केली. ही बातमी येताच गुंतवणूकदार साखर कंपन्यांच्या शेअरवर तुटून पडले. त्याचा परिणाम शेअर्सचे भाव वाढण्यात झाला.

बी ग्रेड जड गुळ आणि उसाचा रस/साखर/गुळापासून तयार होणाऱ्या इथेनॉलचे दर अनुक्रमे ६०.७३ रुपये आणि ६५.६१ रुपये प्रति लिटर कायम ठेवण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत...