Mumbai, जानेवारी 23 -- Netaji Subhash Chandra Bose Birth Anniversary: सुभाषचंद्र बोस हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक होते. त्यांना प्रेमाने आणि आदराने नेताजी म्हणून संबोधले जाते. सुभाषचंद्र बोस हे धैर्य, त्याग आणि देशभक्तीचे एक उत्तम उदाहरण आहेत. ओडिशातील कटक येथे जन्मलेले सुभाष चंद्र बोस यांची जयंती २३ जानेवारी रोजी साजरी केली जाते. त्यांनी भारतीय नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली होती, परंतु ब्रिटिश सरकारची सेवा करण्यास नकार दिला. नंतर त्यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. तथापि, गांधीजी आणि इतर नेत्यांशी वैचारिक मतभेदांमुळे त्यांनी काँग्रेस सोडली. दुसऱ्या महायुद्धादरम्यान, जपान आणि जर्मनीच्या मदतीने त्यांनी "आझाद हिंद फौज" ची स्थापना केली.

त्यांनी अशा घोषणा दिल्या ज्यांनी तरुणांना स्वातंत्...