Mumbai, फेब्रुवारी 3 -- Stock Market News : केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर व त्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील कमी-जास्त तरतुदीनंतर आता गुंतवणूकदारांचं लक्ष शेअर बाजाराकडं लागलं आहे. या पार्श्वभूमीवर बाजार तज्ञांनी खरेदीसाठी १० शेअर्सची शिफारस केली आहे.

चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगरिया यांनी खरेदी करण्यासाठी ५ ब्रेकआऊट शेअर्ससह ७ स्टॉक निवडीची शिफारस केली आहे. आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे यांनी ३ समभाग सुचवले आहे. यात कँटाबिल रिटेल, युनो मिंडा, ऑप्टस व्हॅल्यू हाऊसिंग फायनान्स इंडिया, विनती ऑर्गेनिक्स, ज्योती लॅब्स, बजाज हेल्थकेअर लिमिटेड, शैली इंजिनीअरिंग प्लास्टिक लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, अ‍ॅक्सिस बँक लिमिटेड आणि डीएलएफ लिमिटेड यांचा समावेश आहे.

कॅन्टाबिल रिटेल : सुमित बाग...