भारत, एप्रिल 2 -- जगभरातील देशांवर ट्रम्प यांनी लादलेल्या नव्या शुल्काचा परिणाम आज शेअर बाजारात पाहायला मिळत आहे. दरम्यान, मारुती, कोल इंडिया आणि टाटा समूहाच्या तीन समभागांसह एकूण १० समभागांवर गुंतवणूकदारांची नजर राहणार आहे. हे शेअर्स त्यांच्या अपडेट्समुळे चर्चेत असतात. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत अपडेट्स, ज्यामुळे या शेअर्सवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे...

बोर्डाने कोळशाच्या दरात प्रतिटन १० रुपयांची वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. नॉन कोकिंग कोळशाची किंमत आता प्रतिटन १० ते २० रुपये झाली आहे, तर कोकिंग कोळशाची किंमत प्रतिटन १० रुपये कायम राहणार आहे. ही दरवाढ कोल इंडिया लिमिटेडच्या (सीआयएल) रेग्युलेटेड आणि नॉन-रेग्युलेटेड अशा दोन्ही क्षेत्रांना लागू होईल आणि १६ एप्रिलपासून लागू होईल.

मार्चमध्ये एकूण ९२,९९४ वाहनांची विक्री नोंदवली, जी गेल्या वर...