Mumbai, फेब्रुवारी 12 -- Shares To Buy : मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात सातत्यानं घसरण सुरू आहे. मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी पडझड झाली. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारही सावध झाले आहेत. अशातच तज्ञांनी १०० रुपयांपेक्षा कमी काही शेअर्स सुचवले आहेत.

'चॉइस ब्रोकिंग'चे कार्यकारी संचालक सुमीत बागरिया, एसएस वेल्थस्ट्रीटच्या संस्थापक सुगंधा सचदेवा आणि लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंट अँड सिक्युरिटीज रिसर्च हेड अंशुल जैन यांनी आज १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे पीएनबी, आयएफसीआय, मेडिको रेमेडीज आणि श्रीराम न्यूजप्रिंट या शेअर्सची शिफारस केली आहे.

मेडिको रेमेडीज हा शेअर ६९.९३ रुपयांना खरेदी करा. टार्गेट प्राइस ७५ रुपये ठेवून स्टॉपलॉस ६७.५० रुपये ठेवा.

या शेअरवर 'बाय' रेटिंग असून त्याची टार्गेट प्राइस २१.८० रुपये आहे. स्टॉपलॉस १९.५० रुपये आह...