Mumbai, जानेवारी 27 -- Share Market : काही दिवसांवर आलेल्या बजेटमुळं गुंतवणूकदारांचं शेअर बाजारावर बारीक लक्ष राहणार आहे. केंद्र सरकारच्या मनात नेमकं काय आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही. वेगवेगळ्या क्षेत्रांना बजेटकडून वेगवेगळ्या अपेक्षा आहेत. या पार्श्वभूमीवर बाजाराचा मूड कसा राहील सांगता येत नाही. या पार्श्वभूमीवर तज्ञांनी इंट्राडे व्यवहारासाठी आज काही स्टॉक्स सुचवले आहेत.

चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बागरिया, एसएस वेल्थस्ट्रीटच्या संस्थापक सुगंधा सचदेवा आणि एव्हीपी-हेनसेक्स सिक्युरिटीजचे महेश एम ओझा यांनी येस बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, स्टील एक्स्चेंज, टीटीएमएल, पिल इटालिका लाइफस्टाइल आणि आयईएल हे सहा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

> महेश एम ओझा यांचे शेअर्स

येस बँक १८ ते १९ रुपयांत खरेदी करायला विसरू नका. टार्गेट २० रुप...