Mumbai, जानेवारी 29 -- Share Market : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) वित्तीय व्यवस्थेत दीड लाख कोटी रुपये गुंतविण्याचा निर्णय घेतल्यानंतर मागील सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी ५० ची घसरण थांबली आणि हे निर्देशांक वधारून स्थिरावले. या पार्श्वभूमीवर आज इंट्राडे खरेदीसाठी तज्ञांनी १०० रुपयांपेक्षा स्वस्त पाच शेअर सुचवले आहेत.

असित सी. मेहता इन्व्हेस्टमेंट इंटरमेडिएट्स लिमिटेडचे एव्हीपी टेक्निकल अँड डेरिव्हेटिव्हरिसर्च हृषिकेश येडवे म्हणाले,

'बँक निफ्टी निर्देशांक घसरणीसह उघडला, खरेदीचा जोर पाहिला आणि दिवसअखेर सकारात्मकरित्या ४८,८६७ वर स्थिरावला. जोपर्यंत निर्देशांक ४७,८४० आहे, तोपर्यंत तेजीचा वेग कायम राहण्याची शक्यता आहे. तर ४९,२०० आणि ४९,५०० रेझिस्टन्स पॉईंट म्हणून काम करतील. त्यामुळं ट्रेडर्सनी बँक निफ्टीमध्ये खरेदी-विक्रीचं धोरण अवलंबावं अस...