Mumbai, फेब्रुवारी 9 -- Stock To Watch : जलशुद्धीकरण व सांडपाणी प्रक्रिया क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनी व्हीए टेक वाबागनं तब्बल (३७१ डॉलर) ३२५१ कोटी रुपयांचं कंत्राट मिळवलं आहे. सौदी अरेबियातील रियाध इथं २०० मेगालिटर प्रतिदिन (MLD) स्वतंत्र सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (ISTP) विकसित करण्यासाठी ही ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळं सोमवारपासून या शेअरवर गुंतवणूकदारांची नजर असेल.

कंपनीनं स्वत: रविवार, ९ फेब्रुवारी २०२५ रोजी ही माहिती दिली आहे. या प्रकल्पासाठी वा टेक वाबाग ही कंपनी मियाहोना, माराफिक आणि एनव्ही बेसिक्स एसए या कंपन्यांसोबत सहकार्य करणार आहे. हा प्रकल्प सांडपाणी प्रक्रिया आणि रहिवाशांचं जीवनमान सुधारण्याच्या सौदी अरेबियाच्या व्हिजन २०३० चा एक भाग आहे.

वाबाग या प्रकल्पातील इंजिनीअरिंग, खरेदी आणि बांधकाम (EPC) कंसोर्टियममध्ये तंत्रज्ञान...