Mumbai, फेब्रुवारी 6 -- RDB Infrastructure and Power Limited : मागच्या ५ वर्षांत गुंतवणूकदारांना तब्बल ३००० टक्क्यांहून जास्त परतावा देणारा आरडीबी इन्फ्रास्ट्रक्चर अँड पॉवर लिमिटेडचा शेअर स्प्लिट होणार असून त्यासाठी रेकॉर्ड डेट जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळं हा शेअर स्वस्तात घेण्याची संधी गुंतवणूकदारांना चालून आली आहे.

आरडीबीनं १:१० या प्रमाणात शेअर स्प्लिटची घोषणा केली आहे. शेअर स्प्लिटचा लाभ घेण्यासाठी रेकॉर्ड डेट शुक्रवार, २८ फेब्रुवारी २०२५ ही आहे. या तारखेला रेकॉर्डवर असलेले शेअरहोल्डर्स स्टॉक स्प्लिटचा लाभ घेण्यास पात्र असतील. कंपनीचा शेअर आज किरकोळ घसरणीसह ५५३ रुपयांवर व्यवहार करत आहे.

आरडीबी इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स पाच वर्षांच्या कालावधीत ३००० टक्क्यांनी वाढून मल्टीबॅगर स्टॉक बनले आहेत. ट्रेंडलाइनच्या आकडेवारीनुसार, आरडीबी इन...