Mumbai, फेब्रुवारी 11 -- परकीय भांडवलाचा सततचा ओघ, कमजोर उत्पन्नाची चिंता, मंदावलेला आर्थिक विकास आणि डॉलरच्या तुलनेत देशांतर्गत चलनाची घसरण यामुळे भारतीय शेअर बाजारात अलीकडे विक्रीचा दबाव आहे. गेल्या पाच दिवसांत सेन्सेक्स २५०० अंकांनी घसरला आहे, तर निफ्टी ५० २३ हजारांच्या खाली घसरला आहे.

मंगळवारी, ११ फेब्रुवारीरोजी सेन्सेक्स ७७,३८४.९८ वर उघडला आणि सत्रादरम्यान तो १,२८१ अंकांनी घसरून ७६,०३०.५९ वर बंद झाला. निफ्टी 50 23,381.60 च्या तुलनेत 23,383.55 वर उघडला आणि जवळपास 400 अंकांनी म्हणजेच 1.7 टक्क्यांनी घसरून 22,986.65 वर बंद झाला.

बीएसईमिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक सत्रात प्रत्येकी तीन टक्क्यांनी घसरले. मंगळवारच्या घसरणीसह सेन्सेक्स 2,553 अंकांनी कोसळला आहे, तर निफ्टी 50 मध्ये गेल्या पाच दिवसांत 753 अंकांची म्हणजेच 3.2 टक्क्यांची घसरण झ...