Mumbai, जानेवारी 31 -- Share Market News : आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यापासून सुझलॉन एनर्जीच्या शेअरमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. मागील दोन दिवस कंपनीच्या शेअरला ५ टक्क्यांचं अप्पर सर्किट लागलं. आज तिसऱ्या दिवशीही तेच चित्र कायम होतं. आज हा शेअर ५ टक्क्यांनी वाढून ५८.१७ रुपयांवर पोहोचला आहे. सलग तीन दिवस लागलेल्या अप्पर सर्किटमुळं मागच्या ५ दिवसांत हा शेअर १३.८१ टक्क्यांनी वाढला आहे.

जवळपास १२ ते १५ वर्षे गुंतवणूकदारांच्या तोंडचे पाणी पळवणारा सुझलॉन एनर्जीचा शेअर मागील दीड वर्षांपासून पुन्हा सावरू लागला. मे २०२३ मध्ये ८ रुपयांवर असलेला हा शेअर आज ५८ रुपयांवर आहे. मागच्या ५ वर्षात शेअरनं गुंतवणूकदारांना तब्बल २४८५ टक्के परतावा दिला आहे.

लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंट अँड सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख अंशुल जैन यांनी ...