भारत, फेब्रुवारी 24 -- Stock Market : शेअर बाजारात सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. भारतीय बाजारातून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची माघार, कमकुवत जागतिक संकेत आणि अमेरिका आणि जगातील इतर प्रमुख अर्थव्यवस्थांमधील संभाव्य व्यापार युद्धाच्या चिंतेमुळे बाजारात सलग पाचव्या सत्रात घसरण झाली. 24 फेब्रुवारी रोजी भारतीय शेअर बाजाराचा बेंचमार्क - सेन्सेक्स - 800 अंकांनी पडला. बीएसई सेन्सेक्स 856.65 अंकांनी घसरून 74,454.41 वर आणि एनएसई निफ्टी 242.55 अंकांनी घसरून 22,553.35 वर बंद झाला. यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, सिटीग्रुप इंकने भारतीय शेअर्सना न्यूट्रलवरून 'ओव्हरवेट'मध्ये अपग्रेड केले आहे.

मंदावलेला आर्थिक विकास दर आणि निराशाजनक कमाईच्या चिंतेमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी २३ अब्ज डॉलरचे समभाग विकल्यामुळे बेंचमार्क निर्देश...