Mumbai, फेब्रुवारी 10 -- Share Market News in Marathi : विशिष्ट ब्रँडनेमच्या वापराच्या मुद्द्यावरून काही कंपन्यांविरोधात केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळल्यानं टिळकनगर इंडस्ट्रीज या मद्य कंपनीच्या शेअरला आज मोठा फटका बसला. कंपनीचे शेअर आज थेट २० टक्क्यांनी घसरून २९३.२० रुपयांपर्यंत घसरला.

'मॅन्सन हाऊस' आणि 'सॅव्हॉय क्लब' या ट्रेडमार्क ब्रँड नावांचा वापर करणाऱ्या काही कंपन्यांविरोधात टिळकनगर इंडस्ट्रीजनं याचिका दाखल केली होती. हर्मन जेनसेन बेव्हरेजेस नेदरलँड्स बी.व्ही. आणि इतर कंपन्यांनी त्यांच्या अल्कोहोलिक उत्पादनांमध्ये ही नावं वापरली होती. न्यायालयानं ही याचिका फेटाळताना अलाइड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्सला पश्चिम बंगालमध्ये 'मॅन्सन हाऊस' या नावानं उत्पादनं आणण्यास परवानगी दिली आहे. मात्र, आव्हान याचिका दाखल करण्यासाठी न्यायालया...