Mumbai, फेब्रुवारी 4 -- Anil Ambani Company Share : अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी आली आहे. हा शेअर मंगळवारी ५ टक्क्यांनी वधारून ३९.९१ रुपयांवर बंद झाला. रिलायन्स पॉवरचे शेअर्स ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीत ३४०० टक्क्यांपेक्षा जास्त वधारले आहेत. म्हणजेच या कालावधीत गुंतवणूकदारांना छप्परफाड नफा झाला आहे.

रिलायन्स पॉवरचा शेअर मागील पाच वर्षांच्या काळात १.१३ रुपयांवरून ४० रुपयांवर पोहोचला आहे. रिलायन्स पॉवरचा शेअर २७ मार्च २०२० रोजी १.१३ रुपयांवर व्यवहार करत होता. त्यानंतरच्या कालावधीत त्यात ३४०० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. आज हा शेअर ३९.९१ रुपयांवर बंद झाला.

कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ५४.२५ रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १९.३७ रुपये आहे. रिलायन्स पॉवरचं मार्क...