भारत, मार्च 12 -- रिलायन्सच्या मालकीच्या जिओ प्लॅटफॉर्म्सने (जेपीएल) प्रसिद्ध अमेरिकी उद्योजक एलन मस्क यांच्या मालकीच्या 'स्पेसएक्स' कंपनीसोबत भागीदारी केली असून भारतातील ग्राहकांना स्टारलिंकची हायस्पीड इंटरनेट सेवा उपलब्ध करून देणार आहे. जिओचे भारतातील विस्तृत मोबाइल नेटवर्कचे जाळे असून अमेरिकी कंपनीच्या स्टारलिंक उपग्रह तंत्रज्ञानाच्या सहकार्याने भारतात ग्रामीण भागात अविरत इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्याचा जिओचा प्रयत्न असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. दरम्यान, हा करार सध्या सरकारकडे विचाराधीन आहे. विशेष म्हणजे भारतात हायस्पीड सॅटेलाईट इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी स्टारलिंकच्या स्पेसएक्स कंपनीने भारती एअरटेल कंपनीसोबत ११ मार्च रोजी करार झाल्याचे जाहीर केले आहे.

डेटा ट्रॅफिक बाबत जिओ ही जगातील सर्वात मोठी मोबाइल ऑपरेटर म्हणून ओळखली ज...