भारत, फेब्रुवारी 8 -- अत्याधुनिक टेलिस्कोपच्या सहाय्याने रात्रीचे आकाशदर्शन करून विविध ग्रह, तारे पाहून त्यांच्याविषयी सखोल माहिती जाणून घेण्याची संधी मुंबईतील वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्राने उपलब्ध करून दिली आहे. विज्ञान प्रसारकार्यात अग्रेसर असलेल्या नेहरू विज्ञान केंद्रामध्ये खगोलविज्ञान विषयातील प्रशिक्षित तज्ञांच्या मदतीने अतिशय खुमासदार आणि रंजक पद्धतीने आकाशगंगेचं रहस्य उलगडून दाखविले जाणार आहे. यंदा ११, १३, १५ आणि १६ फेब्रुवारी २०२५ रोजी नेहरू विज्ञान केंद्राच्या गच्चीवर संध्याकाळी ५ः३० ते ८ वाजेदरम्यान खगोलप्रेमींसाठी आकाशदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे नेहरू विज्ञान केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

नेहरू विज्ञान केंद्रातील आकाशदर्शन प्रकल्प आबालवृद्धांच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे. मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्र हे कें...