Mumbai, मे 13 -- Maharashtra Board 10th SSC Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं आपला निकाल पाहता येणार आहे, तसेच गुणपत्रिका डाऊनलोड करून घेता येणार आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन पद्धतीनं निकाल पाहता येतील.

यंदा राज्याचा दहावीचा निकाल ९४.१०टक्के लागला असून यंदाही कोकण विभाग राज्यात अव्वल ठरला आहे. कोकण विभागाचा ९९.८२ टक्के एवढा निकाल लागला आहे. त्यापाठोपाठ कोल्हापूर विभाग असून दहावीच्या निकालात नागपूर तळाला राहिला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली असून मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९६.१४ तर मुलांची टक्केवारी ९२.२१अशी आहे...