Mumbai, फेब्रुवारी 11 -- Soybeanprocurement:केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी वेगवेगळ्या राज्यात भुईमूग आणि सोयाबीनची हमी भावाने खरेदीची मुदत वाढवण्यास मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर पुढच्या चार वर्षांपर्यंत तूर, मसूर आणि उडदाची १०० टक्के खरेदीसही मंजुरी दिली आहे.भारत सरकारने पंतप्रधान अन्नदाता आय संरक्षण अभियान (पीएम-आशा) योजना २०२५-२६ पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे.

केंद्र सरकारकडून महाराष्ट्र, तेलंगाना, कर्नाटक व गुजरात राज्यातील सोयाबीन व भुईमूग खरेदीला मुदतवाढ देण्याचा निर्णय सोमवारी घेतला होता. त्यानुसार महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदीला २४ दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. देशभरात ९ फेब्रुवारी २०२५ पर्यंत १९.९९ लाख मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी केंद्र सरकारने केली आहे. ज्यामुळे ८ लाख ४६ हजार २५१ शेतकऱ्यांना फाय...