Mumbai, एप्रिल 20 -- Healthy Snacks or Breakfast Recipe: रोज नाश्ता करणे गरजेचे आहे. आठवड्याभर तेच रेगुलर पदार्थ खाऊन तुम्हाला कंटाळा असेल. आता विकेंडला तुम्हाला काही तरी वेगळं खावंसं वाटतं असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक हटके रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी फक्त टेस्टीच नाही तर हेल्दी सुद्धा आहे. आपण विकेंडला नाश्ताला बनवा सोया चंक्सचे कटलेट. सोया चंक्स किंवा न्यूट्रिएला बद्दल असे म्हटले जाते की शाकाहारी लोकांसाठी हा प्रोटीनचा सर्वोत्तम पर्याय आहे, परंतु बर्याच लोकांना त्याची चव आवडत नाही, ज्यामुळे निरोगी असूनही लोकांच्या आहारात त्याचा समावेश केला जात नाही.पण, आहारात त्याचा समावेश करण्यासाठी कमी पर्याय आहेत. पण तुम्ही आता सोयाचे कटलेट बनवून खाऊ शकता. खायला चविष्ट असण्यासोबतच ते बनवायलाही खूप कमी वेळ लागतो, चला तर मग जाणून घेऊया या रेसिपीबद्...