भारत, फेब्रुवारी 15 -- तब्बल २५ वर्ष लोकसभा सदस्य म्हणून कार्य केल्यानंतर कॉंग्रेस संसदीय दलाच्या आणि माजी कॉंग्रेस अध्या सोनिया गांधी यांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला. सोनियांनी राजस्थानमधून नुकताच उमेदवारी अर्ज सादर केला आहे. वय आणि तब्येतीच्या कारणावरून आपण संसदेच्या वरिष्ठ सभागृहात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे सोनिया गांधी यांनी पत्रकारांना सांगितले. कॉंग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरील नेतृत्वाने हा निर्णय घेतल्यामुळे बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

खासकरून गांधी कुटुंबाचे सदस्य मुख्यतः उत्तर प्रदेशमधून संसद सदस्य म्हणून निवडून गेलेले आहेत. जवाहरलाल नेहरू, फिरोज गांधी, इंदिरा गांधी, सोनिया गांधींपासून राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील विविध लोकसभा मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधीत्व केलं आहे. खुद्द सोनिया गांधी या २००४ सालापासून ...