Solapur, फेब्रुवारी 2 -- Solapur Man Kills Son: मुलाच्या पॉर्न पाहण्याच्या आणि मुलींची छेड काढण्याच्या सवयीला कंटाळून जन्मदात्या पित्यानं त्याची हत्या केली. महाराष्ट्रातील सोलापूर येथे १३ जानेवारी रोजी ही घटना घडली. मुलाची हत्या केल्यानंतर आरोपीने तो बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी त्वरीत पुढील तपासाला सुरुवात केली. चौकशीत आरोपीने विष देऊन मुलाची हत्या केल्याची उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला २८ जानेवारीला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय बट्टू असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने १३ जानेवारीला आपल्या मुलाला त्याच्या बाईकवरून बाहेर नेले आणि शीतपेयातून विष दिले. त्यानंतर मुलाचा मृतदेह घराजवळील नाल्यात फेकून दिला. गुन्ह्यावर पडदा टाकण्यासाठी आरोपीने मुलगा बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार...