भारत, जानेवारी 26 -- बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारचे गेल्या काही वर्षांपासून सिनेमे फ्लॉप ठरताना दिसत आहेत. मात्र, यंदाचे वर्ष हे अक्षयसाठी चांगले असणार असे चित्र आहे. नुकताच अक्षय कुमारचा स्कायफोर्स हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अक्षयसोबत वीर पहारिया मुख्य भूमिकेत दिसत आहे. अक्षय कुमारचा हा चित्रपट त्याच्यासाठी लकी ठरत आहे. बॅक टू बॅक फ्लॉप चित्रपटांनंतर अक्षयच्या या चित्रपटाने चांगली सुरुवात केली आहे. चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने मोठी झेप घेतली आहे.

sacnilk.com दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत ७५ टक्क्यांची वाढ झाली आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने १२.२५ कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने २१.५० कोटींची कमाई के...