Mumbai, मे 9 -- शास्त्रानुसार आज विविध योग घटित होत आहेत. शशी योगासोबतच आज, शोभन योग आणि कृतिका नक्षत्राचा मोठा प्रभाव दिसून येणार आहे. ग्रह-नक्षत्रांच्या या हालचालींचा परिणाम राशीचक्रातील सर्वच राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक स्वरुपात दिसून येणार आहे. या सर्व बदलांचा परिणाम सिंह,कन्या तूळ आणि वृश्चिक राशीवर कसा होणार आहे ते जाणून घेऊया.

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात आर्थिक लाभाबरोबर प्रतिष्ठाही मिळेल. जमिन विक्रीतून लाभ होईल. घरात एखादे धार्मिक कार्य पार पडेल. नोकरीत अधिकार सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळेल. वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यवसायवृद्धीसाठी प्रवासाचे योग येतील. कोणत्याही व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. स्थावर...