Mumbai, एप्रिल 27 -- 27 april 2024 horoscope : आज शनिवार (२७ एप्रिल) संकष्ट चतुर्थीचा चंद्रमा रवि, शुक्र आणि हर्शलशी षडाष्टक योग करीत असुन मंगळाच्या राशीतुन आणि बुधाचा नक्षत्रातुन गोचर करीत आहे. अशा स्थितीत सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक या राशींसाठी आजचा दिवस कसा जाईल? ते जाणून घेऊया.

सिंह - आज शुभ स्थानात चंद्र असणार आहे. आपली कामे करून घेण्यासाठी एखादे वेळी पडती बाजू घेतली तरी चालणार आहे. परदेशी गोष्टी खरेदीचे योग येतील. स्वच्छंदीपणा थोडी स्वार्थी वृत्ती ठेवणार आहात. घरा मध्ये तुमच्या नवीन विचारांचे स्वागत होईल. आर्थिक निर्णय जबाबदारीने घ्यावे लागतील. दुसऱ्याच्या मनात काय चालले आहे याचा थांगपत्ता तुम्हाला बरोबर लागणार आहे. पूर्ण स्वार्थ व स्वार्थ त्याग अशा दोन पराकोटीच्या भावनांना सामोरे जाणार आहात. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार ...