Mumbai, मे 8 -- बहुतांश लोक दिवसाची सुरुवात राशीभविष्य वाचून करतात. ग्रहांच्या स्थान बदलाने अनेक शुभ-अशुभ योग घडून येत असतात. याचा प्रभाव प्रत्येक राशींवर होत असतो. चंद्राच्या संक्रमणामुळे आज चंद्र, शुक्र आणि सूर्यामध्ये त्रिग्रही योग जुळून येत आहे. या शुभ योगाचा परिणाम सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीवर कसा होणार हे जाणून घ्या.

राशीचक्रातील पाचवी राशी म्हणून सिंह राशीला ओळखले जाते. आज बुधवारचा दिवस सिंह राशीसाठी संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. काही शुभ वार्ता कानावर पडतील. परंतु क्षणिक फायद्यासाठी अविचारी गुंतवणूक करू नका. वादविवाद आणि गैरसमज वाढतील असे संवाद टाळावेत. मिळालेल्या लाभात मन समाधानी राहणार नाही. दूरचे प्रवास शक्यतो टाळा. कोणताही खरेदी विक्रीचा व्यवहार आज करू नका. आरोग्याची विशेष काळजी घ्या. अडचणीच्या काळात स्वतःला सकारत्मक ठे...