Mumbai, एप्रिल 29 -- Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya : आज चंद्र शुक्राशी संयोग होत असुन राजयोग घटित होणार आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक राशीसाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!

आज शुक्राच्या नक्षत्रातील चंद्रभ्रमणात आपणास शुभअशुभ अशी समिश्र स्वरुपाची फळे मिळतील. अनिष्ट चंद्र भ्रमणात मनातील संयशावृती वाढेल. कडक बोलण्या मुळे जवळच्या लोकांची मने दुखावतील. कुटुंबात मुलांच्या वागण्यामुळे ताण निर्माण होईल. विद्यार्थी अभ्यासाच्या नवीन योजना राबवतील. तुमचा मुड कधी जाईल. आणि कधी चिडाल याचा भरवसा राहणार नाही. मुलांच्या कल्पनांमुळे चक्रावून जाल भावनेवर नियंत्रण ठेवा. अनैतिकता वाढीस लागेल. नोकरी मात्र बदल करण्याचा विचार करत असाल तर बदलाची शक्यता आहे. मनावरचा संयम कमी होऊ शकतो. शासकीय कामकाजात अडचणीत आणणारे दिनमान राहील. मित्रमैत्रि...