Mumbai, एप्रिल 26 -- Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya : आज चंद्र मंगळ,बुध,राहु नेपच्युनशी संयोग करत असून, सरस्वतीयोग आणि ग्रहणयोग घटीत होणार आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक राशीसाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!

आज चंद्र मंगळ योगात आपल्या मताशी ठाम असाल तर यशस्वी व्हाल. राजकारणी आणि मुत्सद्दी स्वभावामुळे हरतऱ्हेचे डावपेच खेळायला तुम्ही तयार असाल. लोकमत जिंकण्यासाठी सर्व पणाला लावाल. उपासना करून आध्यात्मिक उंची गाठाल. नवनवीन योजना डोक्यात घोळतील आणि त्या राबवण्यासाठी कष्टाचे डोंगर उपसाल. जवळच्या प्रवासाचे बेत ठरवाल. परिस्थितीचा समन्वय साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कराल. त्यामुळे दुसऱ्यांना आदर वाटेल. बुद्धी व तर्कसंगत वृत्तीने कार्यात सफलता मिळण्याचे योग आहेत. व्यापारात योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे फायदा होईल. वेळेच...