Mumbai, मे 4 -- Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya : आज वरूथिनी एकादशी आहे. चंद्र अहोरात्र कुंभ आणि मीन राशीतुन भ्रमण करणार आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक राशीसाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!

आज रवि-चंद्र योग पाहता घरात किंवा घराबाहेर वादाचे मुद्दे उत्पन्न झाले तर तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल. आर्थिक उलाढाली यशस्वी ठरतील. विश्वासाला न्याय देण्यासाठी जीवाचं रान कराल. स्वत:च्या हिमतीवर कामे पूर्णत्वाला न्याल. पैशाची अडकलेली कामे मात्र पार पडतील. याबाबत मध्यस्थ म्हणून जवळच्या मित्राचा खूप उपयोग होईल. मोठ्या भावंडांची साथ चांगली मिळेल. व्यापारी वर्गासाठी शुभ योग निर्माण होत आहेत. व्यापारात फायदा होईल. जोखमीच्या व्यवहारात मात्र सावधानी बाळगा. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींची प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बढ़तीची संधी आहे. कल्पनाशक्त...