Mumbai, जानेवारी 28 -- Siddhivinayak temple Dress code:मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिर न्यासने एक मोठा निर्णय घेतला असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ड्रेस कोड लागू केला आहे. सिद्धीविनायकाच्या दर्शनाला जायचं असेल तर तेथील ड्रेस कोड नियमाची माहिती असायला हवी. अन्यथा तुम्हाला प्रवेश नाकारला जाऊ शकतो. सिद्धीविनायक मंदिर न्यासकडून ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे.काही भाविकांच्या तक्रारींनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे न्यासच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर प्लास्टिक बंदीचाही निर्णय घेण्यात आला आहे.काय आहे हा नियम? जाणून घेऊया.

मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर न्यासाने ड्रेसकोडसंदर्भात अधिकृत पत्रक जारी केले आहे. दर्शन घेताना अन्य भाविकांना आपल्या कपड्यांमुळे संकोच वाटणार नाही असे कपडे भाविकांनी मंदिर परिसरात परिधान करावे, असे न्यासान...