Mumbai, मार्च 31 -- Shri Swami Samarth Prakat Din 2025 : भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन तिथी प्रमाणे चैत्र शुध्द द्वितीया या दिवशी असतो. यंदाच्या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये सोमवार ३१ मार्च रोजी आहे.

श्री स्वामी समर्थउधळा गुलाल, वाजवारे नगारेत्रैलोक्य चे स्वामी आज धर्तीवर आले.अनुसूयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपादअंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हां कैवाऱ्याचा तूच स्वामी.

इ.स. १८५६ च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. ते मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुध्द द्वितीया, शके १७७८, अनल नाम संवत्सरे, रविवार दि. ०६/०४/१८५६ हा होता.

महाराष्ट्रात गाणगापूर येथील अक्कलकोट हे देशा- परदेशाती...