Mumbai, जून 4 -- Symptoms and Treatment for Shoulder Arthritis: खांद्याचा संधिवात ही एक अशी स्थिती आहे जी जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करते. प्रख्यात शोल्डर तज्ञ डॉ. आदित्य साई, मुख्य सल्लागार, शोल्डर सर्जरी, स्पोर्ट्स इंज्युरीज आणि आर्थ्रोस्कोपी, पवई, डॉ. एलएच हिरानंदानी हॉस्पिटल यांनी खांदा बदलण्याच्या शस्त्रक्रियेतील लक्षणे, उपचार पर्याय आणि नवीनतम प्रगती यावर प्रकाश टाकला.

खांद्याचा संधिवात ही एक अशी स्थिती आहे जिथे खांद्याच्या सांध्याच्या हाडांना जोडणारे कार्टीलेज नष्ट होते. ज्यामुळे वेदना, साध्यांमधील ताठरती आणि गतिशीलता कमी होते. खांद्याचा सांधा हा तीन हाडांनी बनलेला असतो, ज्यामध्ये ह्युमरस (वरच्या हाताचे हाड), स्कॅपुला (खांद्याची चकती) आणि कॉलरबोन (गळ्याचे हाड) यांचा समावेश असतो. खांद्याच्या संधिवाताचा सर्वात सामान्य प्रकारांमध...