Mumbai, फेब्रुवारी 20 -- Shivrayancha Chhava Box Office Collection: महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांचा दैदीप्यमान इतिहास आपण शाळेपासूनच वाचत आलो आहोत. पुढे चित्रपटांच्या माध्यमातूनही तो अनुभवायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले सुपुत्र आणि स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांचा ज्वलंत इतिहास देखील काही चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला. असाच क चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'शिवरायांचा छावा' या चित्रपटातून शंभू राजांची कथा मोठ्या पडद्यावर मांडण्यात आली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'शिवरायांचा छावा' या चित्रपटाचे कलेक्शन नुकतेच समोर आले आहे.

'शिवरायांचा छावा' या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आता चार दिवस उलटले आहेत. या चित्रपटा...