Mumbai, फेब्रुवारी 6 -- Shirdi Sai Baba Mandir News In Marathi : शिर्डी हे एक लोकप्रिय धार्मिक पर्यटन स्थळ आहे जिथे दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येतात. शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज भाविकांची मोठी रीघ लागते. अशात या भाविकांची उत्तम व्यवस्था व्हावी यासाठी शिर्डी साईबाबा संस्थानच्या वतीने अनेक सुख-सुवीधा पुरवल्या जातात. आता शिर्डी साईबाबा संस्थानाने मोफत अन्न प्रसादाबद्दल एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

शिर्डी श्री साईबाबा संस्थानाने मोफत प्रसाद भोजनाबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता साई बाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना टोकन पद्धतीने मोफत भोजन दिले जाणार आहे. साई प्रसादालयात मोफत भोजनासाठी भाविकांना आता कूपन दिले जाणार आहे. साईबा...