New Delhi, नोव्हेंबर 24 -- Shikhar Dhawan On Being Removed As Captain: न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर टीम इंडियाचा सामना झिम्बाब्वे संघाशी होणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी शिखर धवन यांच्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली होती. मात्र, झिम्बाब्वे विरुद्धच्या मालिकेसाठी शेवटच्या क्षणी त्याला बदलून के. एल. राहुल याच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. निवड समितीच्या या निर्णयावर शिखरनं प्रतिक्रिया दिली आहे.

न्यूझीलंडमध्ये उद्यापासून सुरू होत असलेल्या वनडे मालिकेत शिखर धवन भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी देखील त्याचीच निवड झाली होती. मात्र, के एल राहुल फिट होऊन संघात परतल्यानंतर त्याच्याकडं नेतृत्व देण्यात आलं आहे. तडकाफडकी झालेल्या या बदलावर शिखर धवन यानं अत्यंत संयमी आणि प्रगल्भ प्रतिक्रिया दिली आहे.

'माझ्या जा...