Mumbai, फेब्रुवारी 1 -- Union Budget 2025 : नव्या प्राप्तिकर प्रणालीत प्राप्तिकराची मर्यादा १२ लाख रुपयांपर्यंत वाढवल्यानंतर वाहन उद्योग, किरकोळ विक्री क्षेत्र (FMCG) आणि कन्झ्युमर ड्युरेबल क्षेत्रातील शेअर्स उसळी घेतील, असा अंदाज शेअर बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत हिरो मोटोकॉर्प, डाबर इंडिया, मॅरिको, व्होल्टास आणि ब्लू स्टार हे पाच शेअर्स विकत घेण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख अविनाश गोरक्षकर यांनी 'लाइव्ह मिंट'शी बोलताना या संदर्भात अधिक माहिती दिली. 'नव्या प्राप्तिकर प्रणालीत प्राप्तिकराची मर्यादा ७ लाखरुपयांवरून १२ लाख रुपये करून सरकारनं मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला आहे. प्रत्यक्ष करातील या कपातामुळं मध्यमवर्गाच्या हातात अधिक पैसा असेल, त्यामुळं आर्थिक वर्ष २०२६ मध्ये त्...