Mumbai, फेब्रुवारी 7 -- Stock Market Updates : सौर ऊर्जा क्षेत्रातील प्रकल्पांना विविध प्रकारच्या सेवा देणाऱ्या जेनसोल इंजिनीअरिंग लिमिटेडचा शेअर आज कमालीचा उसळला. कंपनीला मिळालेली तब्ब ९६८ कोटी रुपयांची मोठी ऑर्डर हे यामागचं कारण आहे.

जेनसोल इंजिनीअरिंगला गुजरातमधील कच्छ येथील खावडा आरई पॉवर पार्क इथं २४५ मेगावॅट सौर पीव्ही प्रकल्पासाठी सुमारे ९६७.९८ कोटी रुपयांची (जीएसटीसह) ऑर्डर मिळाली आहे. यात तीन वर्षांच्या ओ अँड एम (ऑपरेशन अँड मेंटेनन्स) चा समावेश आहे. जेनसोल इंजिनिअरिंगनं शुक्रवारी, ७ फेब्रुवारी २०२५ रोजी स्टॉक एक्स्चेंजला ही माहिती दिली.

जेनसोलला ऑर्डर मिळाल्याच्या बातमीनंतर शेअर बाजारात त्याचे सकारात्मक पडसाद उमटले. शुक्रवारी इंट्राडे ट्रेडदरम्यान कंपनीच्या शेअरमध्ये ५ टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली. बीएसईवर जेनसोल इंजिनीअरिंगच...